जय महाराष्ट्र म्हणतात, की होम मिनिस्टर, हेच कळत नाही, निलेश राणेंचा हल्लाबोल

मुंबई । आदेश बांदेकर जय महाराष्ट्र म्हणतात, की होम मिनिस्टर हेच कळत नाही, ही अवस्था आजच्या अखंड शिवसेनेची आहे. आजचे शिवसैनिक धड जय महाराष्ट्र बोलू शकत नाहीत, अशा शब्दात माजी खासदार  भाजपचे सचिव निलेश राणे यांनी आदेश बांदेकर यांच्यावर टीकास्त्र डागलं. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना निलेश राणेंनी बांदेकरांवर निशाणा साधला.

 

 

“शिवसेनेत बाहेरच्यांचीच संख्या जास्त आहे, संजय राऊत मोजून बघा. मोबाईलची बटणं दाबणारे शिवसैनिक भरलेत आजच्या शिवसेनेत. आदेश बांदेकर जय महाराष्ट्र म्हणतो की होम मिनिस्टर म्हणतो हेच कळत नाही, ही अवस्था आजच्या अखंड शिवसेनेची. आजचे शिवसैनिक धड जय महाराष्ट्र बोलू शकत नाही, संजय राऊत काय सांगतात” अशा आशयाचं ट्वीट निलेश राणे यांनी केलं आहे.

 

 

 

संजय राऊत काय म्हणाले?

शिवसेना भवन फोडण्याची भाषा करणारे भाजप आमदार प्रसाद लाड यांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सज्जड दम दिला होता. शिवेसना भवन फोडण्याची भाषा करणारे भूमिगत झाल्याचं कळलं आहे. हिंमत असेल तर समोर या. स्वत:च्या पायावर याल, पण खांद्यावर जाल, असा इशाराच संजय राऊत यांनी दिला होता.

You May Also Like