जळगाव : शहरातील हरिविठ्ठल नगरातील एका सतरा वर्षीय तरुणाने राहत्या घरात साडीच्या सहाय्याने गळफास

जळगाव : शहरातील हरिविठ्ठल नगरातील एका सतरा वर्षीय तरुणाने राहत्या घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी ७ वाजता उघडकीस आली आहे.

याबाबत वृत्त असे की, रितेश गुलाबराव मोरे (वय १७, रा. मराठी शाळेजवळ, हरीविठ्ठलनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. रितेश शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होता. दरम्यान, शुक्रवारी त्याची आई व भाऊ असे दोघेजण धुळे येथे नातेवाईकांकडे गेले होते. तर, वडील गुलाबराव सुकलाल मोरे शहरात खाजगी ठिकाणी सुरक्षारक्षक असून ते रात्रपाळीसाठी ड्युटीवर गेले होते. शुक्रवारी रात्री रितेश घरात एकटाच होता. त्याने साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी सकाळी सात वाजता वडील गुलाबराव मोरे ड्युटीवरुन परतल्यावर त्यांनी दार ठोकले तेव्हा रितेश आतून काहीच प्रतिसाद देत नसल्याने शेजाऱ्यांना कळवले. घराचा दरवाजा तोडल्यानंतर रितेश गळफास घेतलेल्या स्थितीत आढळुन आला. रामानंदनगर पोलिस व नागरीकांनी रितेश याला खाली उतरवुन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करुन त्यास मृत घोषित केले. शवविच्छेदन करुन मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस कर्मचारी प्रवीण जगदाळे व मनोज वानखेडे हे प्राथमिक तपास करीत आहेत.

You May Also Like