जळगाव : पिंप्राळा येथे दिराने वाहिनीच्या डोक्यात कु-हाडीने वार करून तिची हत्या केल्याची घटना

जळगाव शहरातील मयुर कॉलनी – पिंप्राळा परिसरात दिराने आपल्या वाहिनीच्या डोक्यात कु-हाडीने वार करून तिची हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून त्याला रामानंद नगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, योगिता मुकेश सोनार (वय ३९) असे मयत विवाहितेचे नाव असून दिपक लोटन सोनार (वय ३८) असे हल्ला करणा-या संशयिताचे नाव आहे. मयत योगिता सोनार यांच्या पतीचे काही महिन्यापुर्वी अपघाती निधन झाले होते. घरातील नेहमीच्या वादातून हा जिवघेणा हल्ला झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच रामानंदनगर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले.

You May Also Like