जळगाव : अट्टल मोटारसायकल चोर स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

जळगाव : अट्टल मोटरसायकल चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे सनी अशोक बाविस्कर वय 21 रा.साथ बाजार पहूर कसबे अनिकेत कडूबा चौथे वय 21 रा. होळी चौक पहुर अशी या चोरट्यांची नावे असून त्यांच्या ताब्यातील चोरीची मोटारसायकल जप्त करून त्यांना पुढील तपासकामी जामनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की सनी अशोक बाविस्कर, अनिकेत कडूबा चौथे या दोघांजवळ जामनेर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील hf डिलक्स मोटारसायकल असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली होती. त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी आरोपीस पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे स.फो. राजेंद्र पाटील स.फो.अशोक महाजन, पो.हवा. अनिल इंगळे, अनिल देशमुख, कमलाकर बागुल, रमेश चौधरी, प्रदीप पाटील,जयंत चौधरी, पो.ना. दीपक चौधरी अश्यांचे पथक रवाना केले होते. माहितीच्या आधारे पथक सदर ठिकाणी जाऊन सनी अशोक बाविस्कर रा.पहूर कसबे अनिकेत कडूबा चौथे यांना ताब्यात घेऊन अधिक विचारपूस केली असता दोघांनी काळा रंग असलेली hf डीलक्स गाडी पोलिसांना काढून दिली सदर मोटरसायकल जप्त करण्यात आली असून, दोघांना पुढील तपासकामी जामनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

You May Also Like