जळगाव : विवाहितेचा पैशांसाठी छळ रामानंदनगर पोलिसात गुन्हा

जळगाव : नोकरीसाठी माहेरुन ५० लाख रुपये आणावेत यासाठी विवाहितेचा छळ केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पती, सासू, सासऱ्यांविरुद्ध मंगळवारी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, ज्ञानदा या हरिविठ्ठल भागात माहेरी वास्तव्याला आलेल्या आहेत. पती व सासरची मंडळीं नाशिक येथे वास्तव्याला आहेत. नोकरीला लावण्यासाठी पतीसह सासरच्यांनी ५० लाख रुपयांची मागणी केली. तसेच पैसे आणले नाही म्हणून सासरच्यांनी विवाहितेचा छळ केला. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी आली. आज मंगळवारी रामानंदनगर पोलीस ठाणे गाठून विवाहिता ज्ञानदा यांनी तक्रार दिली असून या तक्रारीवरुन पोलिस ठाण्यात पती प्रशांत दत्तात्रय थोरात, सासरे दत्तात्रय रामभाऊ थोरात व सासू आशाबाई दत्तात्रय थोरात (सर्व रा.नाशिक) या तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोहेकॉ उषा सोनवणे करीत आहे.

You May Also Like