जळगाव : बी बियाणे व खते भाववाढीचा राष्ट्रवादी किसान सभेतर्फे निषेध

जळगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा किसान सभेतर्फे केंद्र सरकारने केलेल्या खतांसह बी- बियाण्यांच्या भाव वाढीचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला याबाबत जिल्हा प्रशासनाला निवेदन देत जिल्हाधिकारी कार्यालय आवारात निदर्शने करण्यात आली कोरोना , लॉकडाऊन आणि अवकाळी पावसामुळे शेतकरी आधीच संकटांत सापडला आहे. खते, बी-बियाणे भाव वाढीचा राष्ट्रवादी किसान सभेतर्फे निषेध अनेक शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे .खते बियाण्याच्या भाव वाढीमुळे शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे . बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांची लूट सुरू आहे . व्यापारी धड होत असून शेतकरी मात्र कंगाल होत आहे .या परिस्थितीमुळे आता जगायचे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे .त्यामुळे ही भाव वाढ तत्काळ मागे घ्यावी.अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल , असा इशाराही पक्षातर्फे देण्यात आला आहे.
निवेदनावर जिल्हाध्यक्ष महेंद्र शिरसाठ , रणजितराजे भोसले, मनोज कोळेकर, भटू पाटील, योगेश आहिरे, सलीम शेख , आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

You May Also Like