जळगाव :- पन्नास वर्षांवरील महिला पुरुष होमगार्ड जवानांना कोरोना संसर्गाची बाधा होऊ शकतो

जळगाव :- पन्नास वर्षांवरील महिला पुरुष होमगार्ड जवानांना कोरोना संसर्गाची बाधा होऊ शकतो असा कयास बांधून त्यांना कोणताही बंदोबस्त देऊ नये असे आदेश राज्याचे होमगार्ड महासमादेशक यांनी काढलेले आहे.यामुळे शारीरिक पात्रता चाचणी यशस्वी ठरलेल्या वर्षावरील होमगार्ड जवानांवर झालेला अन्याय दूर करून त्यांना पूर्ववत बंदोबस्त मिळावा या मागणीकरिता बच्चुभाऊ कडू प्रणित प्रहार जनशक्ती पक्ष व विविध संघटनांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले.
राज्याचे तत्कालीन होमगार्ड महासमादेशक श्री. संजय पांडे यांनी पकोरुना काळात पन्नास वर्षाच्या पुढील होमगार्ड स्त्री-पुरुष जवानांना बंदोबस्त देऊ नये असे अन्यायकारक आदेश काढलेले आहेत. वास्तविक कोरोनाची बाधा कोणतेही वय पाहून होत नाही. तसे असते तर अनेक बालके, तरुणांना कोरोनाची बाधा झाली नसती. तसेच अनेक शासकीय कार्यालयांमधील तसेच पोलीस विभागातील ५० वर्षाखालील कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा होऊन त्यांना प्राण गमवावा लागला आहे. यामुळे कोरोना हा पन्नास वर्षाच्या पुढील होमगार्ड जवानांना होऊ शकतो असा निव्वळ अंदाज बांधून त्यांना बंदोबस्त पासून वंचित ठेवणे अन्यायकारक आहे. बंदोबस्त मिळत नसल्याने पन्नास वर्षाच्या पुढील होमगार्ड जवानांवर उपासमारीची पाळी येऊन त्यांना रोजंदारी देखील पुढे लागलेल्या संचार बंदीने मिळत नाही. होमगार्ड जवानांनी आतापर्यंत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस दलास सहकार्य केलेले असून २६/११ च्या हल्ल्यात तसेच नक्षलवादी भागातदेखील स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता होमगार्ड जवानांनी महत्त्वाची भूमिका निभावलेली आहे.

You May Also Like