जळगाव : प्रधानमंत्री किसान सन्मान निधि योजनेची रक्कम शेतकऱ्यांची खात्यावर हस्तांतरीत

जळगाव प्रधानमंत्री किसान सन्मान निधि योजना अंतर्गत देशातील ९.५० कोटी लाभार्थी शेतकऱ्यांना आठव्या हप्त्यातील (एप्रिल, २१ ते जुलै, २१) रूपये १९ हजार कोटीहून अधिक रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरणाचा कार्यक्रम दिल्ली येथून १४ मे, २०२१ रोजी प्रधानमंत्री यांच्या हस्ते ऑनलाइन पार पडला आहे.

हस्तांतरित केलेली रक्कम शेतकऱ्यांना खरीप हंगामात बियाणे, खते, औषधे सारख्या कृषी निविष्ठा खरेदी करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. माहे फेब्रुवारी २०१९ मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू झाल्यापासून देशातील १० कोटीहून अधिक शेतकऱ्यांना आत्तापर्यंत रूपये १.१५ लाख कोटीहून अधिक रकमेचा लाभ देण्यात आला आहे. असे धीरजकुमार, आयुक्त, कृषि, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी कळविले आहे.

महाराष्ट्र राज्यात या योजनेअंतर्गत सुरुवातीपासून दि. १३ मे, २०२१ अखेर १०५.३० लाख लाभार्थी शेतकऱ्यांना एकूण रु. ११ हजार ६९४ कोटी रकमेचा लाभ हस्तांतरित झाला आहे. तसेच १४ मे, २०२१ रोजीच्या कार्यक्रमात दि. १ एप्रील, २०२१ ते दिनांक ३१ जुलै, २०२१ या कालावधीकरिता देय आठव्या हप्त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील एकुण ९५.९१ लाख पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना साधारण रूपये 1 हजार ९१८ कोटीचा लाभ थेट त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केला गेला.

चालू वर्षी भारतीय हवामान विभागाने सरासरीच्या ९८ टक्के पाऊस पडण्याचे अनुमान जाहीर केले आहे. पाऊस वेळेवर सुरू होऊन जूनमध्ये पेरणीच्या दृष्टीने हा लाभ खरीप २०२१ हंगामात विविध कृषी निविष्ठा खरेदीसाठी शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणार असून यामुळे कृषी उत्पादन वाढीला चालना मिळणार असल्याचे धीरजकुमार, आयुक्त, कृषि तथा राज्यस्तरीय अंमलबजावणी प्रमुख पीएम किसान, कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

You May Also Like