जळगाव : जळगाव शहरात विविध चौकांमध्ये पोलिसांकडून कसून तपासणी केली जात आहे

जळगाव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ३१ मे पर्यंत अत्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले असून आज १७ मे सोमवारपासून त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली असून शहरातील विविध मुख्य चौकांमध्ये विनाकारण आणि मास्क न घातलेल्या नागरिकांची पोलिसांकडून कसून तपासणी करण्यात येत आहे. शहरातील चित्रा चौक , टॉवर चौक , शिवाजी पुतळा , स्वातंत्र्य चौक , बेंडाळे चौक , अजिंठा चौफुली, काशिनाथ लॉज चौक, आकाशवाणी चौक आदी मुख्य चौकांमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला असून नागरिकांची कसून तपासणी केली जात आहे.

You May Also Like