जम्मू काश्मीर : बडगाम चकमकीत एक दहशतवादी ठार

श्रीनगर । जम्मू काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यातील मोचवा भागात शनिवारी पुन्हा एकदा सुरक्षादलांत आणि दहशतवाद्यांत चकमक झाली. या चकमकीत ‘लष्कर  ए तोयबा’ चा एक दहशतवादी ठार झाला तर दुसऱ्या दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात सुरक्षादलाला यश मिळालंय.

जिवंत पकडण्यात आलेल्या दहशतवाद्याकडून एके ४७ रायफल आणि एक पिस्तूल जप्त करण्यात आलंय. दहशतवादी हालचालींची गुप्त माहिती मिळाल्यानंतर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात सुरक्षादलाकडून सर्च ऑपरेशन राबवण्यात येतंय. याच दरम्यान, दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. त्यानंततर ही चकमक घडून आली.

You May Also Like

error: Content is protected !!