शन्मुखप्रियाचे केलं कौतुक अन्ं जावेद अख्तर झाले ट्रोल

मुंबई : इंडियन आयडल 12 मधील एका भागात गीतकार जावेद अख्तर यांनी हजेरी लावली होती. त्या भागात सगळ्या स्पर्धकांनी जावेद अख्तर यांची गाणी गायिली. जावेद यांनी त्यांच्या प्रत्येक गाण्यामागची कहाणी सांगितली आहे. दरम्यान, जावेद यांनी स्पर्धकांचे भरभरून कौतुक केले. पण जेव्हा त्यांनी स्पर्धक शन्मुखप्रियाचे कौतुक केले त्यावेळी जावेद अख्तर यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले.

शन्मुखप्रियाचे केलेले कौतुक मात्र काही नेटकर्‍यांना पटले नाही असे दिसून येत आहे. नेटकर्‍यांनी जावेद अख्तर यांना ट्रोल केले. काही यूजर्सने तर ीज्ञळळिपवळरपळवेश्र असा नारा सोशल मीडियावर लावल्याचे दिसून येत आहे. एका यूजरने ट्वीट करत शन्मुखप्रियाचे चाहते वेडे आहेतफ असे म्हटले आहे. तर दुसर्‍या एका यूजरने शोचे परीक्षक देखील वेडे असल्याचे म्हटले आहे.

शन्मुखप्रियाचे गाणे उत्तम असल्याचे जावेद यांनी सांगितले. ते म्हणाले ‘आत्तापर्यंत मी शन्मुखप्रियाचे यूट्यूबवर बरेच परफॉर्मन्स पाहिले. पण आज तिला परफॉर्म करताना लाइव्ह पाहिलं. असच काम करत रहा, भविष्यात खूप पुढे जाशील.’ या नंतर शन्मुखप्रियाने देखील आपले मत व्यक्त केले. तिला जावेद अख्तर यांच्यासमोर गाण्याची संधी दिल्याबद्दल तिने इंडियन आयडलचे आभार मानले.आणि त्यांच्या कडून कौतुकाची थाप मिळणे ही खूप मोठी गोष्ट आहे असे ही तिने सांगितले. इंडियन आयडल 12चा सूत्रसंचालक आदित्य नारायणने जावेद यांना म्हणाला की ‘मला तुमच्या सोबत कॉनसर्ट करायला आवडेल.’ पुढे त्याने शन्मुखप्रियाबरोबर लॉकडाउन संपल्यावर कॉनसर्ट करण्याची इच्छादेखील व्यक्त केली.

You May Also Like