‘जॉन्सन’च्या सिंगल डोस लशीच्या वापराला भारतात मंजुरी

नवी दिल्ली । करोना विरोधातील लढ्यात भारताला आणखी बळ मिळणार आहे. कारण, भारत सरकारने जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल डोस लशीला भारतातील वापराला मंजुरी दिली आहे. त्यामुळे ही लस भारतीयांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जॉन्सन अँड जॉन्स कंपनीने लशीच्या आपत्कालीन वापरासाठी भारताकडे मंजुरी मागितली होती. भारताने त्याला हिंरवा कंदील दाखवला आहे. आरोग्य मंत्रालयाने ट्विट करुन यासंदर्भातील माहिती दिली आहे.

 

जॉन्सन अँड जॉन्स कंपनीने लशीच्या आपत्कालीन वापरासाठी भारताकडे मंजुरी मागितली होती. भारत सरकारने जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल डोस लशीला भारतातील वापराला मंजुरी दिली आहे. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने ट्विट करुन दिली आहे.सध्या देशात कोव्हॅक्सिन व कोव्हिशिल्ड या दोन भारतीय लशींच्या व्यतिरिक्त रशियाची स्पुटनिक ही लस उपलब्ध आहेत. यामध्ये जॉन्सन अँड जॉन्सच्या लशीची भर पडली आहे.

You May Also Like