पत्रकार रोहित सरदाना यांचं निधन; करोनावर उपचार सुरू असताना हृदयविकाराचा झटका

मुंबई : आज तक वृत्त वाहिनीचे न्यूज अँकर रोहित सरदाना यांचं करोनामुळे आज सकाळी निधन झालं. २४ एप्रिल रोजी रोहित सरदाना यांनी स्वत:च आपल्याला करोनाची लागण झाल्याचं ट्वीट केलं होतं. दरम्यान, झी न्यूजचे मुख्य संपादक सुधीर चौधरी यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून रोहित सरदाना हे झी न्यूजसोबत होते. २०१८मध्ये त्यांनी झी न्यूज सोडून आजतकमध्ये आपल्या प्रसारमाध्यमातील प्रवासाला सुरुवात केली.  वृत्तवाहिन्यांमधला प्रसिद्ध चेहरा असलेले रोहित सरदाना आज तक वृत्तवाहिनीच्या ‘दंगल’ कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करायचे. २०१८ मध्ये त्यांचा गणेश शंकर विद्यार्थी पुरस्कारानं सन्मान करण्यात आला.

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

You May Also Like

error: Content is protected !!