कंगनानं उडवली महाराष्ट्र सरकारची खिल्ली, म्हणाली ….

मुंबई : मुंबई महानगरपालिकेद्वारे कंगनाचं अनधिकृत बांधकाम पाडण्यात आलं होतं. तेव्हापासून ती सातत्यानं महाराष्ट्र सरकारवर टीका करत आहे. सरकारच्या प्रत्येक निर्णयावर ती प्रश्न उपस्थित करते तसेच ठाकरे सरकार आणि अभिनेत्री कंगना रनौत यांच्यात सतत काहीना काही वाद सुरु असतात.

दरम्यान, देशभरात करोनाची दुसरी लाट आली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या हि चिंतादायक आहे. त्यामुळं या संक्रमणाच्या साखळीला तोडण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं राज्यभरात लॉकडाउन जारी केला आहे.  14 एप्रिल ते 1 मे या काळात संपूर्ण राज्यात लॉकडाऊनचे निर्बंध लागू असतील. या काळात काही उद्योगधंदे सुरु राहतील याची देखील काळजी सरकारनं घेतली आहे. मात्र सरकारच्या या निर्णयावर आभिनेत्री कंगना रणौत हिनं हे कसलं लॉकडाउन असं म्हणत तिनं सरकारची खिल्ली उडवली आहे.

यावेळी तिनं लॉकडाउनचं निमित्त साधून उपरोधिक टीका केली आहे. तिनं एका दरवाजाचा फोटो शेअर केला आहे. हा दरवाजा समोरपासून बंद आहे. परंतु, तरी देखील सर्व बाजूंनी खुला आहे. या दरवाजाचा फोटो शेअर करत “महाराष्ट्रात लॉकडाऊन असा आहे” अशी उपरोधिक टीका तिनं केली आहे. तिचं हे ट्विट सध्या चर्चेत आहे.

ताज्य बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या फेसबुक पेज  आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा… 

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeElqI6

You May Also Like

error: Content is protected !!