अभिनेत्री कंगना रणौत नेहमीच आपल्या बिनधास्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. नुकताच कंगनाचा ‘धाकड’ चित्रपट प्रदर्शित झाला या चित्रपटाच्या सुपरफ्लॉपनंतर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत तिच्या आगामी “इमर्जन्सी” या चित्रपटात इंदिरा गांधी यांची भुमिका साकारणार आहे. ‘इमर्जन्सी’ या चित्रपटात इंदिरा गांधींची भूमिका साकारण्यासाठी तिला अकादमी पुरस्कार विजेते मेक-अप कलाकार डेव्हिड मालिनोवस्की यांचे सहकार्य लाभणार आहे.
आगामी प्रोजेक्टवर एकत्र काम करत असताना तिने डेव्हिडचे फोटो शेअर केले आहेत. इंदिरा गांधींसारखे दिसण्यासाठी प्रोस्थेटिक्सचा वापर केला जाणार आहे. “इमर्जन्सी” हा चित्रपट दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित आहे. असे असले तरी या चित्रपटासंदर्भात अजूनही जास्त काही माहिती शेअर करण्यात आलेली नाही.
याशिवाय कंगना ‘टिकू वेड्स शेरू’ घेऊन येत आहे, ज्यामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर मुख्य भूमिकेत असणार आहेत.
ताज्या बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या व्हॉटस्अॅप ग्रुपला जॉईन व्हा…
https://chat.whatsapp.com/GdbPgC62cnKHS4YUh0x6LE