कार्तिक आर्यनने रेड चिलीजलाही केलां रामराम

मुंबई : अगदी महिन्याभरापूर्वीच निर्माता करण जोहरनं आपल्या ’दोस्ताना 2’मधून बाहेर केलंय. अभिनेता शाहरुख खाननं देखील कार्तिकला त्याच्या चित्रपटातून बाहेर केल्याचं बोललं जात आहे. पण दुसरीकडे क्रिएटिव्ह डिफरेन्सेसमुळे कार्तिकनं स्वतःच शाहरुख खानचा चित्रपट सोडल्याचंही बोललं जात आहे. त्यानंतर आता लगेचच त्याला दुसरा झटका लागला आहे.
कार्तिक आर्यन शाहरुख खानच्या प्रोडक्शनमध्ये तयार होत असलेल्या एका चित्रपटात काम करणार होता. ज्यासाठी त्यानं आगाऊ रक्कमदेखील घेतली होती. पण क्रिएटिव्ह डिफरेन्सेसमुळे कार्तिकनं हा चित्रपट सोडला आहे. तसेच त्यानं घेतलेली रक्कमसुद्धा परत केली आहे.

दरम्यान या चित्रपटाची अधिकृत घोषणा झाली नव्हती. पण याच वर्षात या चित्रपटाचं शूटिंग सुरू होणार होतं. ज्यात कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन अजय बहल करत होते. या चित्रपटाची निर्मिती शाहरुख खानच्या रेड चिलीज प्रॉडक्शन हाऊस करत होतं. या चित्रपटात अभिनेत्री कतरिना कैफ कार्तिकसोबत काम करणार होती असंही बोललं जात आहे.

सध्या कार्तिक आर्यनकडे ’भूल भुलैय्या 2’ हा चित्रपट आहे. ज्यात त्याच्यासोबत अभिनेत्री कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अनीस बाज्मी करत आहेत. याशिवाय तो रोहित शेट्टीच्या एका चित्रपटातही दिसणार आहे.

You May Also Like