KBC 13 ला मिळाला तिसरा करोडपती, ७ कोटीच्या प्रश्नाचे उत्तर देणार ही स्पर्धक?

‘कौन बनेगा करोडपती’ या शोकडे प्रेक्षक माहितीचा स्त्रोत म्हणून पाहतात. ‘कौन बनेगा करोडपती’चे १३ पर्व सुरु आहे. कौन बनेगा करोडपतीला त्यांचा तिसरा करोडपती भेटला आहे. गीता सिंह गौर असे त्यांचे नाव आहे. गीता या गृहीणी आहेत. गीता यांनी १ कोटीच्या प्रश्नाचे अचुक उत्तर दिले आहे. आता त्या ७ कोटी रुपयाच्या प्रश्नाचे उत्तर देणार आहेत. या एपिसोडचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे.
शोचा हा प्रोमो सोनी टिव्हीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये ५३ वर्षाच्या गीता बोलतात की माझं संपूर्ण आयुष्य हे मुलांचा सांभाळ करण्यात घालवलं आहे. आता माझ्या आयुष्याची सेकेंड इनिंग मला स्वत: साठी जगायचे आहे. प्रोमोमध्ये गीता या जीप चालवताना देखील दिसत आहेत.

You May Also Like