केदारनाथ धामची उघडली कवाडं; ११ क्विंटल फुलांनी सजलं मंदिर

देहराडून : उच्च हिमालयी क्षेत्रात वसलेल्या जगप्रसिद्ध केदारनाथ मंदिराचे दरवाजे सहा महिन्यांनंतर आज सकाळी पाच वाजता उघडण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर मंदीर ११ क्विंटल फुलांनी सजवण्यात आलं. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षीप्रमाणेच यावर्षीदेखील श्रद्धाळू उपस्थित राहू शकले नाहीत.

तिरथ सिंह यांनी सांगितले कि, जगप्रसिद्ध अकरावे ज्योर्तिलिंग भगवान केदारनाथ धामाचे दरवाजे आज सोमवारी पहाटे पाच वाजता विधी आणि पुजा करुन उघडण्यात आले आहेत. मी बाबा केदारनाथ यांच्याकडे सर्वांना निरोगी ठेवण्याची प्रार्थना करतो. केदारनाथचे मुख्य पुजारी आदरणीय भीमाशंकर लिंगम यांच्या आणि मोजक्या पुजार्‍यांच्या उपस्थितीमध्ये मंदिरात बाबा केदार यांची नियमित पुजा केली जाईल.

आज मंगळवारी पहाटे सव्वाचार वाजता चमोलीमधील भगवान बदरीनाथचे दरवाजेही उघडण्यात येतील. करोनामुळे इथेदेखील भक्तांना येण्याची परवानगी नसेल. करोनाच्या पार्श्वभूमीवर उत्तराखंड सरकारनं लागू केलेल्या नियमांनुसार, केदारनाथ आणि बदरीनाथचे दरवाजे उघडताना पुजारी, देवस्थान बोर्डाचे पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकार्‍यांसह केवळ २५ लोकांना उपस्थित राहायला परवानगी असणार आहे. याआधी शुक्रवारी म्हणजेच  १४ मे रोजी यमुनोत्री आणि शनिवारी पाच मे रोजी गंगोत्रीचे दरवाजे खुले करण्याच्या वेळीही हीच व्यवस्था लागू केली गेली होती.

You May Also Like