केतकी चितळेची कारागृहातून सुटका; ठाणे कोर्टाने केला जामीन मंजूर

मुंबई : टीव्ही मालिकांमधील अभिनेत्री केतकी चितळे हिने तिच्या फेसबुक खात्यावर शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकुर पोस्ट केला होता. या प्रकारानंतर दि. १४ मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याच्या तक्रारीच्या आधारे कळव्यात एफआयआर दाखल केल्यानंतर केतकीला १५ मे रोजी अटक करण्यात आली होती. केतकी चितळेने बुधवारी 22 मे ला उच्च न्यायालयात नवी याचिका दाखल करत त्यात कळवा पोलिसांनी केलेली अटक बेकायदा ठरवण्याची मागणी केली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी अटक झालेल्या मराठी अभिनेत्री केतकी चितळेची आज कारागृहातून सुटका करण्यात आली आहे. ठाणे कोर्टाने बुधवारी केतकी चितळेला जामीन मंजूर केला होता. महिन्याभरापासून कारागृहात असलेल्या केतकीने हसतं बाहेर आल्यावर प्रसारमाध्यमांसमोर ‘जय हिंद, जय महाराष्ट्र’ अशी घोषणा दिली.

यावर प्रसारमाध्यमांनी केतकी चितळेला प्रतिक्रिया विचारली असताना तिने जेव्हा बोलायचं असेल तेव्हा मी बोलेन असे सांगितले. तसेच मी कारागृहात एफवाय बीएच्या विद्यार्थ्यांना शिकवत होते. मुले चांगली असून त्यांना शिक्षकांची गरज असल्याचेही ती म्हणाली. यावेळी प्रसारमाध्यमांनी केतकीला  बोलतं करण्यासाठी प्रश्न विचारले, पण तिने जास्त बोलणं टाळले.

ताज्या बातम्यांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपला जॉईन व्हा…

https://chat.whatsapp.com/GdbPgC62cnKHS4YUh0x6LE

You May Also Like