१५ वर्षीय अल्पवयीन मुलीला फुस लावुन पळवून नेहण्याचा प्रकार

मोरगाव – लोणी भापकर ता. बारामती येथील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला फुस लावुन पळवून नेहण्याचा प्रकार नुकताच घडला आहे . या प्रकरणी मुढाळे येथील महादेव लाला खोमणे याच्या विरोधात वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे.

ही मुलगी दौंड तालुक्यातील भांडगाव येथे आपल्या आईसोबत राहत होती. या अल्पावयीन मुलीला तिच्या राहत्या घरातून फुस लावून पळवून नेण्यात आले आहे.

संबंधीत मुलीला महादेव लाला खोमणे (रा. मुढाळे ता. बारामती) या व्यक्तीने पळवून नेहले असल्याने या संदर्भात मुलीच्या आईने वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे .

या तक्रारीनुसार आरोपी महादेव खोमणे या विरोधात कलम ३६३ , अनुसूचित जाती जमाती सुधारणा अधीनियम २०१५ कलम ३ (२) (व्हीए) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधीकारी नारायण शिरगावकर करीत आहेत.

You May Also Like