कोव्हिशील्डला युरोपातील 8 देशांत हिरवा कंदिल

एका दिवसांपूर्वी भारताने दिला होता इशारा
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून लसींच्या ग्रीन पासवरुन चर्चा सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर युरोपातील आठ देशांनी कोव्हिशील्ड लसीला ग्रीन पास देत आपल्या देशातील आपत्कालीन वापराच्या लसींमध्ये समाविष्ट केले आहे. त्यामुळे आता या देशांमधील ज्या लोकांनी कोव्हिशील्ड लसीचे दोन्ही डोस घेतले आहे त्यांना करोना नियमांतून सूट दिली जाणार आहे.

 

भारताने म्हटले होते की, जर या लसीला युरोपात ग्रीन पास मिळाली नाही तर आम्हीही या देशातील लस प्रमाणपत्राला ग्राह्य धरणार नसल्याचे म्हटले होते. त्यासोबतच या देशांतून जे कोणी येतील त्यांना क्वारंनटाईन करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. मान्यता देणार्‍या देशांमध्ये जर्मनी, स्लोव्हेनिया, ऑस्ट्रिया, ग्रीस, आइसलँड, आयर्लंड, स्पेन आणि स्वित्झर्लंडचा आदी देशांचा समावेश आहे. भारत सरकारने एका दिवसांपूर्वी युरोपाला ग्रीन पासवरुन इशारा दिला होता.

 

युरोपियन युनियनचे डिजिटल कोविड प्रमाणपत्र योजना मग्रीन पासफ 1 जुलैपासून लागू करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोना महामारीदरम्यान नोंदणीकृत लस घेतलेल्या लोकांना ग्रीन पास असलेल्या देशांमध्ये जाण्याची परवानगी दिली जाणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भारतात लसीकरण केलेल्या लोकांच्या कोविड प्रमाणपत्राला कोविन पोर्टलवर व्हेरिफाय करता येईल असे भारताने युरोपियन वैद्यकीय एजन्सीला सांगितले आहे.

You May Also Like