कृणाल पंड्या करोना पॉझिटिव्ह 

 कोलंबो ।  श्रीलंका दौर्‍यावर वनडे मालिका २-१ने जिंकल्यानंतर शिखर धवनच्या नेतृत्वात टीम इंडियाला टी-२० मालिका जिंकण्याची आज उत्तम संधी होती. आज मंगळवारी कोलंबोमध्ये दोन्ही संघात दुसरा टी-२० सामना रंगणार होता, पण टीम इंडियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू कृणाल पंड्याला करोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे.

 

 

बायो बबलमध्ये करोनाचा शिरकाव झाल्यामुळे दोन्ही संघांना आयसोलेट केले असून आजचा सामना स्थगित करण्यात आला आहे. दोन्ही संघांतील खेळाडूंच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या, तर हा सामना उद्या बुधवारी म्हणजेच २८ जुलैला खेळला जाईल, असे सुत्रांनी सांगितले आहे.

 

You May Also Like