अद्यापही शहरातील नकाणे तलाव निम्माच

धुळे । शहरासह आजूबाजूच्या परिसरात दोन दिवसांपासून संततधार पावसानंतरही पिण्याचा  पाणीपुरवठा करणारा नकाणे तलाव निम्माच भरला आहे. त्याच्या जलसाठ्यात अपेक्षित वाढ झालेली नाही.  सद्यःस्थितीत केवळ ८० दिवस पाणीपुरवठा होईल इतका म्हणजे ९५ एमसीएफटी पाणीसाठाया तलावात शिल्लक आहे.

 

 

तापी पाणीपुरवठा योजनेआधी शहराला पूर्णतः नकाणे तलावातूनच पाणीपुरवठा करण्यात येत होता. या तलावातून रोज एक एमसीएफटी पाणीपुरवठा करण्यात येतो. नकाणे तलावात सध्या अल्प पाणीसाठा असला तरी या तलावाच्या वरच्या बाजूला हरणमाळ तलाव आहे. त्याची क्षमता ३५० एमसीएफटी इतकी आहे. त्यात सध्या समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध आहे. अपेक्षित पाऊस न झाल्यास हरणमाळ तलावामधून नकाणे तलाव भरण्यात येईल. अक्कलपाडा धरणाचेही काम सुरू आहे. ते डिसेंबरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या धरणावरून पाणी सुरू झाल्यास पाण्याची चिंता मिटणार आहे.

 

 

You May Also Like

error: Content is protected !!