दागिन्यांसह सव्वादोन लाखाचा ऐवज लंपास; तळोद्यात चोरट्यांनी साधला घरफोडीचा डाव

तळोदा : तळोदा शहरात एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या असून चोरट्यांनी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. लॉकडाऊनची संधी साधत चोरट्यांनी तळोदा शहरात दोन घरफोड्या करून सुमारे सव्वा लाखाचा मुद्देमाल चोरून नेला आहे.

शहरात भगवान नगरमध्ये राहणारे रतीलाल दगडू मराठे हे आपल्या मूळ गावी निंबोरा ता. कुकरमुंडा जि.तापी आपल्या कुदुंबांसह अक्षय तृतीया निमित्त गेले असता सकाळी ११ ते सायंकाळी ०६  वाजेच्या दरम्यान बंद घराचा कडीकोंडा तोडून अज्ञात चोरांनी घरातील कपाटात ऊसाचे व गव्हाचे पेमेंट पाच लाख साठ हजार रुपये रोख व तीन तोळे  सोन्याचा हार असा एकूण सात लाख चाळीस हजार रुपयांची चोरी करून चोर पसार झाले. तपास सपोनि अविनाश केदार करीत आहेत.

दुसऱ्या घटनेत गिरीधर आप्पा नगर मधील गोरख रतन पाटील यांच्या घरात देखील दिवसा ११ ते 2 वाजेच्या सुमारास ५८ हजाराची रोख रक्कम घेऊन चोर पसार झाले. गोरख पाटील आपल्या कुदुंबांसह कामानिमित्त बाहेर गावी गेले असता बंद घराचा कडीकोंडा व कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी भर दुपारी दोन वाजेच्या सुमारास चोरी केली आहे. पुढील तपास सपोनि अभय मोरे करीत आहेत. दोन्ही ठिकाणी चोरी करण्याचा प्रकारामध्ये साम्य असल्याचे दिसून येते. नवीनच रुजु झालेले तळोदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंडीत सोनवणे यांना चोरट्यांनी एक प्रकारे आव्हान दिले असून घडलेल्या घटनेचा तपास पोलीस लवकर लावतील, असा अपेक्षा जनसामान्यांना वाटत आहे.

You May Also Like