नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनच्या टाकीतून गळती 

नाशिक : करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात एकीकडे ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असून गंभीर परिस्थिती असतानाच नाशिकमध्ये ऑक्सिजन गळती झाल्याचा प्रकार समोर आला आहे.  नाशकातील डॉ झाकीर हुसेन हॉस्पिटल येथे एप्रिलच्या सुरवातीला ऑक्सिजनची टाकी बसवण्यात आली आहे. आज याठिकाणी ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत होता. यावेळी या टाकीत ऑक्सिजन भरत असताना अचानक ऑक्सिजन लिक झाल्याने सर्वत्र रस्त्यावर पसरला.

रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झालं असून गळती रोखण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहे. झाकीर हुसेन रुग्णालयात १३० रुग्ण दाखल असून गळतीनंतर काही रुग्णांना इतर ठिकाणी हलवण्यात आलं आहे.

मोठ्या प्रमाणावर टॅंकरमधून ऑक्सिजन रस्त्यावर पसरला असून राज्यात ऑक्‍सिजनचा आधीच तुटवडा जाणवत असताना ऑक्सिजनची गळती झाल्यामुळे सोशल मीडियातून रोष व्यक्त केला जात आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या फेसबुक पेज  आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा… 

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

You May Also Like