द्वारकाधीश मंदिरावर वीज कोसळली; ध्वजस्तंभाचं नुकसान 

सुरत । संपुर्ण देशभरात मान्सून सक्रिय झाला असून, अनेक भागांत मुसळधार ते अतिवृष्टी सदृश्य पाऊस कोसळत आहे. तर दुसरीकडे विजा कोसळून अनेकांना जीव गमवावा लागला आहे. वीज पडतानाचा असाच एक व्हिडीओ कॅमेर्‍यात कैद झाला असून, हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गुजरातमधील द्वारकेत असलेल्या प्रसिद्ध द्वारकाधीश मंदिराच्या ध्वजस्तंभवर वीज पडली. वीज पडतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.

जगप्रसिद्ध द्वारकाधीश मंदिरावर मंगळवारी वीज पडल्याची घटना घडली. वीज कोसळतानाचा व्हिडीओ समोर आला असून, तो व्हायरलही झाला आहे. मंगळवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. वीज पडल्याने मंदिराच्या 52 फूट उंच ध्वजस्तंभाचं नुकसान झालं आहे. तर भिंती काळ्या पडल्या आहेत. मात्र, मंदिराचं कोणतंही नुकसान झालेलं नाही.

वीज पडल्याच्या घटनेनंतर द्वारकेचे उपजिल्हाधिकारी निहार भेटारिया यांनी घटनेनंतर लगेच मंदिराला भेट दिली आणि परिसराची पाहणी केली. वीज पडल्यामुळे मंदिराचं कोणतंही नुकसान झालेलं नाही. पाहणी करण्यात आल्यानंतर मंदिरातील दैनंदिन कार्यक्रम संथगतीने सुरू करण्यात आले.

द्वारकेत गोमती नदीच्या तिरावर द्वारकाधीश मंदिर उभारण्यात आलेलं असून, हे मंदिर तब्बल 2200 वर्ष जुनं आहे. या मंदिर परिसरात भगवान श्रीकृष्ण यांच्याबरोबरच सौभद्रा, बलराम, रेवती, वासुदेव, रुख्मिणी अनेक देवी देवतांचीही स्थापना करण्यात आलेली आहे.

You May Also Like

error: Content is protected !!