तीन चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाला यश

मोटारसायकल चोरी करणाऱ्या तीन चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाला यश आले आहे. चेतन योगेश पाटील, सागर रवींद्र पाटील दोघे राहणार शनी मंदिर चौक पारोळा, विक्रम अरुण गायकवाड राहणार पारोळा अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना धरणगाव पोलीस स्टेशन भाग 5 गुरनं 248/20121 भादवि कलम 379, व धरणगाव पोलीस स्टेशन भाग 5 गुरनं 499/ 2020 भादवि कलम 379 येथील चोरी झालेली मोटरसायकल चेतन योगेश पाटील राहणार शनिमंदिर चौक पारोळा याने चोरी केली असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक डॉक्टर श्री प्रवीण मुंडे, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार बकाले यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सफो. अशोक महाजन, पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रदीप पाटील,पो.हे.कॉ. जयंत चौधरी, पो.हे.कॉ. दादाभाऊ पाटील, पो.ना. नंदलाल पाटील, पो.ना प्रमोद लाडवंजारी, पो.ना किरण धनगर, पो.ना. विनायक पाटील, व पोलीस कॉन्स्टेबल भगवान पाटील, पोलीस कॉन्स्टेबल सचिन महाजन, पोलीस कॉन्स्टेबल मुरलीधर बारी, पोलीस कॉन्स्टेबल अशोक पाटील यांचे आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना केले होते पथकाने शोध घेऊन, चेतन योगेश पाटील रा. शनिमंदिर चौक पारोळा याला ताब्यात घेतले त्याला अधिक विचारपूस केली असता, त्याने त्याचा साथीदार सागर रवींद्र पाटील यांच्या मदतीने दोघ मोटरसायकली विक्रम गायकवाड राहणार पारोळा याला विकल्याचे कबूल केले. त्या अनुषंगाने विक्रम गायकवाड याला देखील या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे.

You May Also Like