CoronaVirus : दिल्लीत आज रात्री १० पासून लॉकडाऊन, मुख्यमंत्री केजरीवाल यांची घोषणा

नवी दिल्ली :  देशात करोनाचा प्रसार वेगाने होत आहे. सध्या देशासमोर हे खूप मोठे संकट उभे राहिले असून या संकटाचा सामना कसा करायचा असा प्रश्न सर्वांसमोर उभा ठाकला आहे, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात ३० एप्रिल पर्यंत कडक निर्बंध लागले आहेत तर देशाची राजधानी दिल्लीत आज सोमवारी रात्री १० वाजल्यापासून ते सोमवारी २६ एप्रिलपर्यंत (सकाळी ६ वाजेपर्यंत) लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. याबाबतची घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज सोमवारी केली.

खाद्य पदार्थ सेवा, औषध पुरवठा आदी अत्यावश्यक सेवा सुरुच राहतील. विवाह सोहळ्यासाठी केवळ ५० लोकांनाच उपस्थित राहता येईल, असे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी म्हटले आहे.

हा खूप कमी कालावधीचा म्हणजेच ६ दिवसांचा लॉकडाऊन आहे. त्यासाठी स्थलांतरित कामगारांनी दिल्ली सोडून जाऊ नये. मला खूप आशा आहे की आम्हाला यापुढे लॉकडाऊन वाढविण्याची गरज भासणार नाही. सरकार तुमची काळजी घेईल, असे आश्वासन केजरीवाल यांनी दिले आहे.

लॉकडाऊनच्या कालावधीचा उपयोग ऑक्सिजन, औषधे उपलब्ध करण्यासाठी केला जाईल. दिल्लीत आणखी बेड्स उपलब्ध केले जातील, असेही त्यांनी म्हटले आहे.

दिल्लीतील कोरोनाचे संकट गंभीर होत चालले आहे. या पार्श्वभूमीवर मोठी मैदाने, मंदिर परिसर तसेच रिकाम्या जागांवर कोव्हिड उपचार केंद्रांची स्थापना करण्याचे काम दिल्ली सरकारने वेगाने चालू केले आहे. दिल्लीतील कोरोना रुग्णांची दैनिक संख्या आता २५ हजारांच्या पुढे गेली आहे.

ताज्य बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या फेसबुक पेज  आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा… 

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeElqI6 

 

You May Also Like