दिल्लीतील लॉकडाउन एका आठवड्यासाठी वाढवला

नवी दिल्ली : देशातील कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. करोनाच्या चौथ्या लाटेचा सामना करत असलेल्या दिल्लीतील परिस्थिती एका आठवड्याच्या लॉकडाउननंतरही कायम आहे.  नवी दिल्लीत वाढत्या करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेला लॉकडाऊन आणखी एक आठवड्यांसाठी वाढवण्यात आला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याबाबतची घोषणा केली आहे.

रुग्णवाढीचा वेग, कोलमडण्याच्या मार्गावर असलेली आरोग्य व्यवस्था, ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे रडकुंडीला आलेली रुग्णालये आणि रुग्णांचे होत असलेले मृत्यू ही परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने दिल्लीतील लॉकडाउन एका आठवड्याने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

सविस्तर बातमी थोड्याच वेळात…

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

You May Also Like