महाराष्ट्रातील लॉकडाऊन वाढवावाच लागेल,राजेश टोपेंनी दिले संकेत

मुंबई : करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य सरकार आणखी एक मोठा निर्णय घेणार आहे. राज्यात कोरोनाला  थोपवण्यासाठी लागू करण्यात आलेले ब्रेक द चेन अंतर्गतचे प्रतिबंधात्मक नियम आणखी वाढवण्यात येणार आहेत. हे नियम आणखी 15 दिवसांकरfता वाढवले जाऊ शकतात. कोरोनाला थोपवण्यासाठीच्या उपायोजना, तसेच लसीकरणावर चर्चा करण्यासाठी आज (28 एप्रिल) राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली.

दरम्यान, लॉकडाऊन वाढवावाच लागणार असल्याची परिस्थिती सध्या राज्यात आहे. त्या अनुषंगाने सध्याच्या लॉकडाउनच्या शेवटच्या दिवशी त्याबाबतचा निर्णय घेतला जाईल’, असं राजेश टोपे म्हणाले आहेत.

“सध्या आपण ३० एप्रिलपर्यंत लॉकडाउन लागू केला आहे. त्यासंदर्भात देखील मंत्रिमंडळात चर्चा झाली. आपल्याला कोणत्याही परिस्थितीत लॉकडाउन वाढवावाच लागेल, अशी परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे. मंत्रमंडळाने त्यासंदर्भात देखील चर्चा केली आहे. शेवटच्या दिवशी नक्की १५ दिवस वाढवायचे किंवा किती वाढवायचे यावर निर्णय घेतला जाईल. पण लॉकडाउनमध्ये नक्कीच वाढ होणार आहे आणि ती किमान १५ दिवसांची होईल असा माझा अंदाज आहे”, असं राजेश टोपे म्हणाले आहेत.

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

You May Also Like