राज्यात १ जूननंतरही लॉकडाउन?; आदित्य ठाकरेंचे उत्तर

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने 1 जूनपर्यंत राज्यात कठोर निर्बंध लावले आहेत. राज्य करोनाच्या संकटाला सामना देत असताना दुसरीकडे तौते चक्रीवादळामुळे अजून एका संकटाचा सामना करावा लागतोयं. पावसाळा तोंडावर आला असताना सरकारसमोरील आव्हानं वाढण्याची शक्यता असून लॉकडाउन वाढणार की उठवणार हे पाहावं लागणार आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले कि, करोना रुग्णांच्या संख्येवर हे सर्व अवलंबून असेल. राज्यात चाचण्यांची संख्या वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करत असून प्रत्येकाने चाचणी करावी यासाठीही पुढाकार घेत आहोत. करोना रुग्णसंख्या किती आहे यावरच लॉकडाउन उठवला जावा की वाढवला जावा हे अवलंबून असेल. लॉकडाउन असला तरी राज्यात महत्वाची कार्यालयं, निर्मिती उद्योग, आयात आणि निर्यात सुरु आहे. तसंच राज्यासाठी जास्तीत जास्त लस मिळवण्याचा प्रयत्न करतोयं. जागतिक स्तरावरही प्रयत्न सुरु आहेत. जर सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये येऊ शकणार्‍या तिसर्‍या लाटेला रोखायचं असेल तर जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण करणं गरजेचं आहे.

You May Also Like