लॉकडाउनचा निर्णय राज्‍य सरकारने घ्‍यावा : गृहमंत्री अमित शहा

नवी दिल्ली : करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील परिस्थिती गंभीर बनली आहे.या कारनास्तव रुग्णांचे बेड तसेच ऑक्सिजन साठी हाल होत आहे. या परिस्थितीमुळे पुन्हा देशात पुन्हा लॉकडाउन लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, तीन महिन्‍यांपूर्वीच केंद्र सरकारने लॉकडाउनचा निर्णय घेण्‍याबाबतचे सर्व अधिकार राज्‍य सरकारला दिले आहेत. ज्‍या राज्‍यांमध्‍ये रुग्‍णसंख्‍या झपाट्याने वाढत आहे. येथील राज्‍य सरकारने लॉकडाउनबाबत निर्णय घ्‍यावा, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

एका इंग्रजी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना अमित शहा म्‍हणाले, लॉकडाउन सारखे उपायांबाबत निर्णय घेता यावा, यासाठी तीन महिन्‍यांर्पूीच राज्‍य सरकारांना अधिकार देण्‍यात आले आहे. कारण देशातील प्रत्‍येक राज्‍यांमधील कोरोनाची परिस्‍थिती वेगळी आहे, असे स्‍पष्‍ट करत संपूर्ण देशात लॉकडाउन लागू केले जाईल, ही शक्‍यता त्‍यांनी फेटाळून लावली.

गेल्‍या वर्षी लॉकडाउनमध्‍ये केंद्र सरकारने कोरोनाशी लढा देण्‍यासाठी मुलभूत सुविधा उभारल्‍या आहेत. मागील वर्षी कोरोना संसर्गाचे संकट वेगळे होते. त्‍यावेळी या विषाणूविरोधातील उपचारांची प्राथमिक माहितीही नव्‍हती. तसेच लसही उपलब्‍ध नव्‍हती. मात्र एक वर्षानंतर परिस्‍थिती बदलली आहे. आता कोरोना प्रतिबंधासाठी लस आहे. तसेच कोरानावरील उपचारासाठींच्‍या सुविधांमध्‍येही वाढ झाली आहे. आपण करोनाविरोधातील युद्‍ध निश्‍चित जिंकू, असा विश्‍वासही त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

You May Also Like

error: Content is protected !!