‘लव्ह आजकल 2’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

मुंबई : बॉलिवूड दिग्दर्शक इम्तियाज अली यांचा ‘लव्ह आजकल २’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमातून कार्तिक आर्यन आणि सारा अली खान ही फ्रेश आणि बहुचर्चित जोडी प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसणार आहे. काल या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज झाल्यानंतर आता या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

लव्ह आज कल या सिनेमाचा फर्स्ट लुक सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. पोस्टरमध्ये सारा अली खान आणि कार्तिक आर्यन रोमॅण्टिक पोझ देताना दिसत आहेत. सिनेमात लव्ह स्टोरी दाखवण्यात येणार असल्याचं पोस्टर पाहून लक्षात येतं.

 

सारानं करण जोहरच्या चॅट शोमध्ये कार्तिकला डेट करायची इच्छा बोलून दाखवल्यानंतर अभिनेता रणवीर सिंहने एका इव्हेंटमध्ये या दोघांची भेट घडवून आणली होती. त्यानंतर या जोडीची लोकप्रियता लक्षात घेता इम्तियाज अली यांनी ‘लव्ह आजकल २’साठी साइन केलं आणि यांच्यातील जवळीक वाढलेली दिसून आली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा…

You May Also Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.