पंचवटी : पंचवटी विभागातील पंचवटी जलशुध्दीकरण केंद्राच्या आवारात असलेल्या नवीन १७.५० लक्ष लिटर क्षमतेच्या जलकुंभाच्या मुख्य जल वितरण वाहीनीच्या क्रॉस कनेक्शनचे काम मंगळवारी (दि.५) रोजी हाती घेतले जाणार असून. त्यामुळे जलकुंभावरुन पाणी वितरण होणार नसल्याने नागरिकांनी महापालिकेकडून सूचना करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, प्रभाग क्रमांक ४ मधील आर.टी.ओ. मेरी परिसर, तारवाला नगर, स्वस्तीक नगर, लामखेडे मळा ते हिरावाडी दिंडोरी रोडवरील अवधुतवाडी, फुले नगर, पंचवटी पोलिस स्टेशन, श्रीरामनगर, लोकसहकार नगर, निमाणी परीसर त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक पाच मधील मधील निमाणी ते पंचवटी कारंजा परिसर, पंचवटी भाजी मार्केट, दिंडोरी नाका, पेठ नाका, इंदकुंड, एरंडवाडी, मेघराज बेकरी ते पंचवटी कारंजा मालेगांव स्टॅंन्ड पासुन रामकुंडा पर्यंत पंचवटी गावठाण मधील मालविय चौक शनिचौक व रामकुंड परीसर आदी परिसरात मंगळवारचा दिवसभराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे तर बुधवारी (दि.६) सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
ताज्या बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा…
आमच्या व्हॉटस्अॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टिक करा
https://chat.whatsapp.com/G3QUYKDCYrv0LJH8z2pUkE