मध्य प्रदेशातील पोटनिवडणूक लोकांसाठी ठरली प्राणघातक? 17 शिक्षकांचा मृत्यू!

दमोह : करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात काही निर्बंधासह लॉकडाउन करण्यात आलायं. नागरिकांनी करोनापासून बचाव करण्यासाठी प्रशासनाने सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्याचे आवाहन केले आहे. मात्र राजकीय मंडळीचं करोनाचे नियम पायदळी तुडवत असल्याचे दिसतंय. तेलंगणात पोट निवडणुकीदरम्यान 15 शिक्षक कर्मचार्‍यांचा करोनामुळे मृत्यू झाला तर शेकडो जणांना करोनाची लागण झालीयं. असाच प्रकार मध्य प्रदेशात देखील समोर आला आहे. दमोहमधील पोटनिवडणूक लोकांसाठी प्राणघातक ठरली आहे.

निवडणुका पार पाडण्यासाठी दमोह जिल्ह्यातील 800 शिक्षकांची ड्युटी लावण्यात आली होती. यापैकी 200 शिक्षकांना निवडणूक प्रशिक्षण आणि मतदान संपल्यानंतर करोनाने गाठले. तर ड्युटीवर असलेल्या कमीतकमी 17 जणांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. यामध्ये शिक्षक, राजकारणी कार्यकर्ते आहेत. त्यामुळे शिक्षकांच्या कुटुंबानी सरकारवर रोष व्यक्त केला आहे.

दमोह येथील 58 वर्षीय सरकारी शिक्षक, ब्रजलाल अहिरवार यांनाही पोटनिवडणुकीवर तैनात करण्यात आले होते. त्यांचे करोनामुळे निधन झाले. त्यांचा 25 वर्षांचा अभियंता मुलगा अजय रोहित विचारात पडला आहे. की जर त्याने आपल्या वडिलांना निवडणुकीच्या ड्युटीवर जाण्यापासून रोखले असेल तर काय झाले असते? रोहित म्हणाला, ‘माझ्या वडिलांची इच्छा होती की विधानसभा पोटनिवडणूक पुढे ढकलण्यात यावी, परंतु पीपीई किट मिळाल्यामुळे कोविड होऊ शकत नाही, असा त्यांचा विश्वास होता. दोन दिवसांनी ते परत आले. त्यांना ताप आला आणि 5 मे रोजी जिल्हा रुग्णालयात त्यांचे निधन झाले. दुसर्‍याच दिवशी, त्यांची 51 वर्षीय पत्नी प्यारीबाई यांचाही करोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले आणि तिथेच त्यांचाही मृत्यू झालायं. यामुळे कुटूंब देखील उध्वस्त झालं.

You May Also Like