CoronaVaccine : महाराष्ट्र सरकार परदेशातून आयात करणार करोना लस

मुंबई : देशासह राज्यभरात करोना स्थिती अतिशय गंभीर आहे. दरम्यान, महाराष्ट्रात  करोना रुग्ण संख्येचा दर चिंतादायक, तसेच देशात आणि परिणामी राज्यातही करोना लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे.

राज्य सरकारने आता राज्यातील लसीकरणाचा कार्यक्रम अधिक व्यापक करण्यासाठी परदेशातून करोनाच्या लसी आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ब्रिटनच्या धर्तीवर आता करोनाच्या लसीकरणाच्या कार्यक्रमासाठी राज्यातील सर्व खात्यांचा फंड वापरण्यात येईल, असा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

केंद्र सरकारने देशातील 18 वर्षावरील सर्वांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाचे महाराष्ट्र सरकारने स्वागत केले आहे. आता राज्यात व्यापक स्तरावर लसीकरणाचा कार्यक्रम राबवण्यात येणार असून त्याला निधी कमी पडला तर ब्रिटनच्या धर्तीवर राज्यातील सर्व खात्यांच्या फंडात कपात करण्यात येईल आणि तो फंड लसीकरणाच्या कार्यक्रमासाठी वापरण्यात येईल, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

सात लाख करोना लसींची राज्यात दररोज आवश्यकता असताना केंद्राने लसीच्या पुरवठ्यावर बंधने घातली असल्यामुळे केवळ तीन लाखच लसी दररोज देण्यात येतात, असे राज्य सरकारकडून या आधी सांगण्यात आले होते. राज्यातील करोनाबाधितांची संख्या वाढत असताना ब्रिटनचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन त्यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला जाईल असे, राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ब्रिटनमध्ये गेल्या वर्षी आणि या वर्षाच्या सुरुवातीला करोनाची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती.

दरम्यान, ब्रिटनमध्ये आतापर्यंत 60 टक्के लोकसंख्येचे लसीकरण पूर्ण झाले असल्यामुळे सध्या तेथील करोनाबाधितांची संख्या आणि मृत्यूचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. संपूर्ण ब्रिटनमध्ये तीन महिने लॉकडाऊन करण्यात आला होता आणि या काळात मोठ्या प्रमाणात करोना लसीकरणाचा कार्यक्रम राबवण्यात आला होता.

ताज्य बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या फेसबुक पेज  आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा… 

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

 

You May Also Like