Coronavirus : राज्यात दिवसभरात 2498 नवे करोना पॉझिटिव्ह, 4501 रुग्णांना डिस्चार्ज 

मुंबई : राज्यात २,४९८ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या १९,२२,०४८ झाली आहे. राज्यात एकूण ५७,१५९ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज ५० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ४९,३०५ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५७ टक्के एवढा आहे.

 

आज ४,५०१ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १८,१४,४४९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.४ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,२५,४३,७७२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,२२,०४८ (१५.३२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,५२,५३५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,१३८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

You May Also Like