महाराष्ट्र ऑक्सिजनमध्ये स्वयंपूर्ण असणारे पहिलं राज्य ठरणार : मुख्यमंत्री ठाकरे

ठाणे । करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजन नसल्याने विविध अडचणींचा सामना करावा लागला होता. संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी प्रत्येक जिल्ह्याने ऑक्सीजन बाबत स्वयंपूर्ण व्हावे यासाठी युद्धपातळीवर काम चालू आहे, महाराष्ट्र हे देशातील ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणारे पहिले राज्य ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

 

 

 

मीरा भाईंदर येथील ऑक्सिजन प्रकल्पाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण करण्यात आले यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे नगरसेवक आदी उपस्थित होते. मीरा भाईंदर महानगरपालिकेने विविध लोकोपयोगी विकासात्मक कामे केलेली आहेत. यामध्ये जलतरण तलाव तसेच नाट्यगृह यांचे काम प्रगतीपथावर आहे. मीरा भाईंदर या भागांमध्ये कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी आमदार प्रताप सरनाईक यांच्या कामाच्या माध्यमातून लोकोपयोगी कामे करण्यात आली आहेत, आणि भविष्यामध्ये केली जाणार आहेत, याविषयी मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. कोरोनामुक्त होईल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

You May Also Like