महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून शहरातल्या 8 रुग्णालयांत मोफत उपचार केले

नाशिक : नाशिक शहरात म्युकरमायक्रोसिसच्या रुग्णांवर शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून शहरातल्या 8 रुग्णालयांत मोफत उपचार केले जाणार आहेत. याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनांकडून पत्रकान्वये प्रसिद्ध करण्यात आली आहे. विशेष म्हणजे नाशिक शहरातील नामांकित रुग्णालयांचा देखील समावेश करण्यात आला आहे. म्युकर मायकोसिसचे उपचार महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत करण्यात येत असल्यानं रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना दिलासा मिळणार आहे.
या रुग्णालयांचा समावेश

नाशकातील सह्याद्री,व्होकार्ट,नामको, सिक्स सिग्मा, एमव्हीपी मेडिकल कॉलेज,एसएमबीटी यासोबतच जिल्हा रुग्णालयात देखील आता या रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. अशी माहितीच जिल्हा प्रशासनाने दिल्यामुळे रुग्णांचे हाल थांबणार आहेत.महाराष्ट्रात सुरुवातीच्या टप्प्यात उत्तर महाराष्ट्रात म्युकर मायकोसिसचे अधिक रुग्ण आढळून आले होते. नाशिकमध्येही म्युकर मायकोसिससचे रुग्ण आढळले होते. त्यानंतर महाराष्ट्रात कोरोना पाठोपाठं म्युकर मायकोसिसचं संकट निर्माण झालेलं पाहायला मिळालं.

नाशिकमध्ये कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. नाशिकमध्ये सध्या डेंग्यू, चिकनगुनिया रुगणांची संख्या वाढली आहे. नाशिक मनपाकडून उपाययोजनांवर भर देण्यात येत आहे. जून महिन्यात डेंग्यूचे 44 रुग्ण आढळले आहेत. मनपाच्या आरोग्य विभागाकडून शहरात

नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे..गेल्या अनेक वर्षांपासून प्रस्तावित असलेल्या या हायस्पीड रेल्वे मार्गाला अखेर मुहूर्त लागल्याने नाशिककरांमध्ये आणि पुणेकरांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांचा तूर्तास सर्वेक्षणाला पाठिंबा असला तरी उद्या सिन्नर मध्ये शेतकऱ्यांची बैठक होणार असून या बैठकीकडे सगळ्यांच लक्ष लागले आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना नियमानुसार मोबदला देण्याचं महारेलने आश्वासन दिल आहे. साडे सोळा हजार कोटींचा एकूण रेल्वे मार्गाचा प्रस्ताव असून या रेल्वे मार्गामुळे नाशिक आणि पुणे कनेक्टिव्हिटी आणखी वाढणार आहे

You May Also Like