Mājī gr̥hamantrī anila dēśamukha yān̄cyā gharāvara sībī’āyacā chāpā, gunhā dākhala

मुंबई :महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घर आणि इतर मालमत्तांवर सीबीआय छापा टाकला आहे. मुंबईसह दहा ठिकाणी सीबीआयने धाड टाकली असून १०० कोटींच्या कथित वसुली प्रकरणी ही कारवाई केली गेली. दरम्यान अनिल देशमुख सध्या नागपूरमध्ये आहेत.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या 100 कोटींच्या कथित वसुलीप्रकरणी सीबीआयने सुरुवातीला अनिल देशमुख यांची चौकशी केली होती. त्यानंतर गुन्हा दाखल झाला आणि आता देशमुख यांच्या घरासह मालमत्तांवर छापा टाकला आहे. सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांची चौकशी सीबीआयने करावी असा आदेश दिला होता त्यानंतर सीबीआयने देशमुख यांची चौकशी केली होती.

You May Also Like