महाराष्ट्रातील कोर्टाचा मोठा निर्णय; तीन भावांना 14 दिवसांची कोठडी

वृक्षतोड प्रकरण आले अंगलट

नंदुरबार : देशभरात नुकताच 5 जुन रोजी पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. पर्यावरणााचा र्‍हास थांबविण्यासाठी झाडे लावा झाडे जगवा मोहिम राबविण्यात येत आहे. मात्र झाडं तोडल्याप्रकरणी तीन भावांना महाराष्ट्रातील कोर्टाने तब्बल 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 60 झाडांची कत्तल केल्याप्रकरणी नंदुरबारमधील नवापूर कोर्टाने हा दणका दिला आहे. आरोपी तीन भावांनी नवापूर तालुक्यातील प्रतापपूर जंगलात सागवान आणि कुडी जातीची 60 झाडं तोडली होती. याप्रकरणी नवापूर वन विभागाने गुन्हा दाखल करुन न्यायालयात हजर केले. त्यावेळी न्यायालयाने तिघांना 14 दिवसांची कोठडी सुनावली.

जंगलातील सागवान आणि कुडी जातीचे अवैधरित्या वृक्ष कत्तल केल्याने 17 हजारांचे नुकसान झाले आहे. संशयित आरोपी विलास गावीत, प्रवीण गावीत,अरविंद गावीत रा.बोरझर यांना त्यांचा राहत्या घराजवळून अटक करण्यात आली. त्यांचाविरोधात वन कायदेअंतर्गत गुन्हा नोंद केला. वनपाल बोरझर यांनी तिन्ही आरोपींना नवापूर न्यायालय येथे हजर केले.

 

आरोपी तीन भाऊ विलास, प्रवीण आणि अरविंद गावीत हे तीन भाऊ हे नवापूर तालुक्यातील बोरझर गावात राहतात. मात्र या भावांनी जवळच्या जंगलात मोठी वृक्षतोड केली. या तिघांनी थोडी थोडकी नव्हे तर तब्बल 60 झाडं तोडली. सागवान आणि कुडी या जातीची ही झाडं होती. सागवानाच्या लाकडाला मोठी मागणी आहे. त्यामुळे या झाडांची कत्तल या तिघा भावांनी केली. वन विभागाने धडक कारवाई करुन तिघा भावांवर गुन्हा दाखल केला होता.

You May Also Like