पावसामुळे बोराडीसह परिसरात मोठे नुकसान

बोराडी : बोराडीसह परिसरात आज दुपारी अचानक सोसायटयाचा वारा व पाऊसामुळे अनेक घरांची पत्रे, रस्त्यावरची झाडे उन्मळून पडली. तसेच शेत शिवारांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वादळी पावसामुळे धाबापाडा येथील बोअरवेलवर झाड पडल्याने दीड ते दोन लाखाचे नुकसान झाले. घरावर झाड पडल्याने एकाच कुंटूबातील पाच ते सहा लोक जखमी झाली आहेत.
पावसामुळे दिपक रंधे यांच्या शेळीपालन गोठ्यातील पत्रे उडून 60 ते 70 हजारांचे नुकसान झाले. आहे. बोराडी परिसरात नुकसानीचा आकडा लाखोंच्या घरात असून शासनाने अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्तांना तातडीने भरपाई देण्याची मागणी माजी भाजपा तालुकाध्यक्ष राहुल रंधे यांनी केली आहे.

बोराडी येथील मातोश्री बनुमाय कन्या विद्यालयातील एका वर्ग खोलीचे पत्रे उडाली व संगणक रूममध्ये पाणी घुसल्याने चार ते पाच संगणक खराब झाले तसेच परिसरातील वृक्ष मुळासकट उपटून पडली आहेत. देवा ताराचंद गुजर यांच्या शेतातील लिंबूचे बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच शंशाक रंधे शेतातील गुरांच्या गोठ्यावर वृक्ष पडल्याने गोठ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दिपक रंधे यांचा शेळीपालन गोठा तील पत्रे उडून व चारा खराब झाला असून सुखदेव गोसावी व रोहित रंधे यांच्या शेतातील घराचे पत्रे उडून गोठ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील शेतकर्‍यांना बसला आहे. बोराडी येथील दिपक रंधे यांच्या परवाच बसवलेल्या पत्र्याच्या घराचे सर्व पत्रे मोडून पडून नुकसान झाले आहेत.तसेच धाबापाडा येथील दारासिंग पावरा यांच्या शेतातील बोरिंग लावलेल्या जागी झाड कोसळल्याने बोरिंग मधील मोटर तुटून बोरिंग मध्ये फसून शेतकर्‍यांचे 1 ते 1.25 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

तसेच अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाल्याने विजेचे तार तुटून पडलेत तसेच काही अंशी झालेल्या पावसामुळे बोराडी येथील लेंढर्‍या नाल्यात पूर सदृश स्थिती निर्माण झाली असून परिसरातील अनेक घरांचे नुकसान झाले.तसेच भावसिंग वण्या पावरा रा.बोराडी यांच्या शेतात राहणार्‍या बोरश्या गिलदार पावरा रा.नवा धाबापाडा यांच्या अंगावर शेतातील घराची भिंत कोसळल्याने त्यांना इजा पोहोचल्या व बोराडी येथून प्रथमोपचार घेऊन त्यांना परत पाठविण्यात आले.

उपसरपंच राहूल रंधे यांनी केली पाहणी
बोराडीसह परिसरात आज 29 मे रोजी दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होत सोसाट्याचा वारा सुटला. त्याबरोबर विजेच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. वातावरणात बदल वादळी वार्‍यासह पाऊसाला सुरवात झाल्याने शेतकरी बांधवांची चांगलीच धावपळ उडाली आहे. पावसाला सुरुवात होतास वीज महामंडळाने वीज पुरवठा बंद केला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर भाजपचे माजी तालुका अध्यक्ष बोराडी गावाचे उपसरपंच राहुल रंधे यांनी पाहणी केली.

You May Also Like