तब्बल ८५ वर्षांनंतर मल्लखांबाची ऑलिम्पिक वारी!

ऑलिम्पिकच्या समारोप समारंभामध्ये मल्लखांबाची प्रात्यक्षिके सादर करण्याची मिळणार संधी 

पुणे । भारतीय क्रीडापटूंची पहिली तुकडी रविवारी सकाळी टोक्योत दाखल झाली. आठ क्रीडाप्रकारांतील ५४ खेळाडू आणि अन्य ३४ कर्मचाऱ्यांचा या तुकडीत समावेश आहे. मल्लखांब या भारतीय क्रीडाप्रकाराला ८५ वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये सादरीकरणाची संधी मिळणार आहे. जपानमधील टोक्यो येथे होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये मल्लखांबाची प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत.

दि. ३० जुलै आणि १ ऑगस्ट १९३६ या कालावधीत बर्लिन ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यात डॉ. विश्वनाथ कर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली ३० मल्लखांबपटूंनी प्रात्यक्षिके सादर करून जगभरातील क्रीडापटूंची मने जिंकली होती. या संघाचा जर्मनीचे चॅन्सलर अ‍ॅडॉल्फ हिटलर यांनी प्रशस्तिपत्रक आणि सुवर्णपदक देऊन गौरव केला होता, अशी माहिती राष्ट्रीय मल्लखांबपटू आणि प्रशिक्षक श्रीनिवास हवालदार यांनी दिली. टोक्योत ऑलिम्पिकच्या समारोप समारंभामध्ये मल्लखांबाची प्रात्यक्षिके सादर करण्याची संधी ८५ वर्षानंतर पुन्हा खेळाडूंना चालून आली आहे.

 

या दरम्यान, भारतीय क्रीडापटूंची पहिली तुकडी रविवारी सकाळी टोक्योत दाखल झाली. आठ क्रीडाप्रकारांतील ५४ खेळाडू आणि अन्य ३४ कर्मचाऱ्यांचा या तुकडीत समावेश आहे. पुढील तीन दिवस या सर्वाना ऑलिम्पिकनगरीत विलगीकरण करावे लागणार असल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात आली.

You May Also Like