पश्चिम बंगालमध्ये सर्वांसाठी लस मोफत, ममता बॅनर्जींची घोषणा

पश्चिम बंगाल : देशभरात करोनाने थैमान घालून ठेवला आहे. दिवसेंदिवस करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होतेय. तर दुसरीकडे पश्चिम बंगाल मध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज एक महत्त्वाची घोषणा केली आहे. राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीला आता पश्चिम बंगाल सरकार मोफत लस देणार आहे.

दक्षिण दिनाजपूर भागातल्या एका सभेत बोलताना त्यांनी ही घोषणा केली आहे. ५ मेपासून राज्यात जे कोणी पात्र असतील त्या सर्वांना लस पूर्णपणे मोफत दिली जाणार आहे. ममता यांनी नुकतंच लसींच्या नव्या किमतींवरुन केंद्र सरकारवर ताशेरे ओढले होते.

त्या म्हणाल्या होत्या, “भाजपा कायम एक देश, एक पक्ष, एक नेता असं ओरडत असतं. पण लोकांचे प्राण वाचवण्यासाठी ते लसीची एक किंमत मात्र ठरवू शकत नाहीत. प्रत्येक भारतीयाला मोफत लस मिळायला हवी. यासाठी त्यांचं वय, जात, पंथ, स्थळ अशा कोणत्याही मर्यादा नकोत. खर्च केंद्र करो किंवा राज्य, पण भारत सरकारने देशभरात करोना प्रतिबंधक लसीची एकच किंमत ठरवून द्यायला हवी.”

दरम्यान, सिरम या लस उत्पादक कंपनीने कालच त्यांच्या कोविशिल्ड या लसीच्या नव्या किमती जाहीर केल्या. यानुसार, राज्य सरकारांना ही लस ४०० रुपयांना मिळणार असून खाजगी दवाखान्यांना हीच लस ६०० रुपयांना मिळणार आहे.

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

 

You May Also Like