आंबे व जांभळे आणि करवंदाचेही आकर्षण असते. करवंदे आणि जांभळे यांना रानमेवा म्हटले जाते

यंदा उन्हाळ्यातही पाउस होता तर आता थेटा पावासाळाच सुरू झाला आहे. मात्र उन्हाळ्याच्या दिवसात आंबे आणि फणसांइतकेच जांभळे आणि करवंदाचेही आकर्षण असते. करवंदे आणि जांभळे यांना रानमेवा म्हटले जाते. खाल्ल्यानंतर जीभ आणि तोंडही जांभळे करणारी जांभळे लहान मुलांना विशेष प्रिय असतात.

जांभूळ फळाचे अनेक फायदे आहेत. मूळ दक्षिण आशिया आणि आग्नेय आशियात आढळणाऱ्या जांभूळ फळाचे शास्त्रीय नाव मसायझिजियम क्‍युमिनीफ असे आहे. जांभळ्या रंगाच्या या फळाची चव गोड-तुरट असते.

उन्हाळ्याच्या शेवटी व पावसाळ्याच्या सुरुवातीस काळसर जांभळ्या रंगाच्या जांभळाचे घड झाडाला लगडलेले दिसतात. जांभळाचा मोसम अतिशय कमी दिवसांचा असतो. ग्रीष्म ऋतूत आंबा हे अमृतफळ असते, तर वर्षांऋतूत जांभूळ हे अमृतफळ असते. लांबट आकाराची जांभळे ही खरोखरच चवीला आंबट-गोड व रसरशीत असतात. जांभळांचा आस्वाद हा तृप्तिदायक, आल्हाददायक असतो.

जांभळामध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस, क जीवनसत्त्व यांचे प्रमाण अधिक असते. तर किंचित प्रमाणात ब जीवनसत्त्व असते. यामध्ये प्रथिने, खनिजे, तंतूमय व पिष्टमय पदार्थ व थोडया प्रमाणात मेद असतो. त्याचबरोबर कोलीन व फोलिक आम्लही त्यामध्ये असते. जांभळाच्या कोवळ्या पानात ई जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात आहे.

जांभळाच्या बियांमध्ये ग्लुकोसाईड जांबोलिन हा ग्लुकोजचा प्रकार असल्यामुळे साखर वाढल्यावर हा घटक पिष्टमय पदार्थाचे साखरेत रूपांतर करण्यावर आळा घालतो. म्हणूनच जांभूळ व त्याचे बी मधुमेह या आजारावर अत्यंत गुणकारी आहे.
जांभळामध्ये लोहतत्त्व जास्त प्रमाणात असल्यामुळे याच्या सेवनामुळे रक्त शुद्ध व लाल होते.

पोटदुखी, अपचन, अशुद्ध ढेकर येणे अशा विकारांवर जांभळाचे सरबत प्यावे..
यकृताची कार्यक्षमता वाढवून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी 7-8 जांभळे चारपट पाण्यात भिजत घालून नंतर 15 मिनिटे उकळावीत त्यानंतर जांभळातील बीसह जांभळाचा पाण्यामध्ये लगदा करावा व हे द्रावण दिवसभरात 3-4 वेळा प्यावे. यामुळे रक्तातील वाढलेली साखर कमी होते व यकृत कार्यक्षम होऊन विविध आजारांविरुद्ध रोगप्रतिकारकशक्ती तयार होते.

गर्भाशयाच्या बीजकेशांना सूज आल्यामुळे अनेक स्त्रियांना वंध्यत्व निर्माण होते. अशा वेळी हा आजार आटोक्‍यात आणण्यासाठी जांभूळ बी 100 ग्रॅम, मंजिष्ठा 50 ग्रॅम, कारले बी 59 ग्रॅम, अशोका चूर्ण 50 ग्रॅम व सारिवा 50 ग्रॅम या सर्वाचे चूर्ण एकत्र करून सकाळी 1 चमचा व रात्री 1 चमचा घ्यावे. यामुळे बीजांडकोषाची सूज (पी.सी.ओ.डी.) हा आजार आटोक्‍यात येतो.
जांभळाचे बी व साल ही मधुमेह या आजारावर अत्यंत उपयुक्त आहे. जांभूळ बी 150 ग्रॅम, हळद 50 ग्रॅम, आवळा 50 ग्रॅम, मिरे 50 ग्रॅम कडुलिंबाची पाने 50 ग्रॅम, व कारल्याच्या बिया. यांचे चूर्ण एकत्र करून सकाळी व संध्याकाळी जेवणानंतर दोन चमचे घेणे. यामुळे मधुमेह हा आजार आटोक्‍यात आणण्यास मदत होते.

पोटात येणारा मुरडा व अतिसार थांबण्यासाठी जांभळाची साल स्वच्छ धुवून पाण्यात उकळावी व हा काढा सकाळी व संध्याकाळी कपभर प्यावा. याने पोटात येणारी कळ थांबून जुलाब थांबतात.

स्त्रियांमध्ये होणाऱ्या श्‍वेतप्रदर रोगावर जांभळाच्या सालीचा काढा हा अत्यंत उपयोगी आहे. जांभळाची साल स्तंभनकार्य करीत असल्याने या आजारावरगुणकारी आहे.

You May Also Like

error: Content is protected !!