May 9, 2021 रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी घरगुती उपाय जाणून घ्या…

गेल्या सव्वा वर्षात रोगप्रतिकारक शक्ती बाबत सर्वांनाच महत्व पटलं असेलच, आजच्या काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर भर देणं हे किती गरजेचं आहे याची जाणीव आपल्या झाली असेलच.

रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे काय हे आपण आधी जाणून घेऊ या…शरीरात बाहेरून प्रवेश करणाऱ्या विषाणूना प्रतिकार करण्याची शरीरांतर्गत तयार होणारी क्षमता म्हणजे रोगप्रतिकार शक्ती होय.

आता रोगप्रतिकारक क्षमता नैसर्गिक रित्या वाढवण्यासाठी घरगुती उपाय जाणून घेऊ,नियमित व्यायामासह दैनंदिन आहारामध्ये पौष्टिक पदार्थांचा समावेश असणे अत्यंत आवश्यक आहे. पौष्टिक आहार न घेतल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होऊन आपण आजारांशी लढण्यास कमी पडतो.

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ‘क’ जीवनसत्त्व असलेले फळे खा…जसे की लिंबू, आवळा, संत्री या फळांमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्व ‘क’ आढळते. जीवनसत्त्व ‘क’ च्या सेवनाने शरीरात वेगवेगळ्या रोगांशी लढण्याची प्रतिकार शक्ती निर्माण होते.तर हाडेही मजबूत होतात.

औषधी काढा किंवा चहा
तुळस, आले, दालचिनी किंवा मिरे आणि हळद यांपासून बनविलेला काढ्यामध्ये नैसर्गिक औषधी गुणधर्म असतात. आले आणि गवती चहापासून बनविलेला चहा आरोग्यदायी असतो. सर्दी, खोकला आणि अन्य आजारांवर एक घरगुती आणि गुणकारी उपाय म्हणून काढा आणि चहाचा उपयोग होतो. तुळस आणि हळदीमध्ये अँटीबॅक्टरीयल आणि दाहक विरोधी गुणधर्म असतात. तसेच घशातील खवखवीवर उपयुक्त ठरतो.

सकाळच्या कोवळ्या उन्हातून शरीराला जीवनसत्त्व ‘ड’ मिळते. कोवळे ऊन अंगावर घेतल्यास शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढते.
जीवनसत्त्व ‘ड’ मिळविण्यासाठी आहारात मासे आणि दुधाचा समावेश करावा.
लसूण
कच्चा लसूण औषधी मानला जातो. लसणामध्ये जीवनसत्त्व अ, सल्फर आणि झिंक मुबलक प्रमाणात असतात. तसेच लसणामध्ये गंधकाचे प्रमाण जास्त असते. लसणातील अँटिऑक्सिडंट गुणधर्म आतड्यातील जंतू संसर्गावर गुणकारी असते.

हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. पालक मध्ये फोलिक आम्ल असते. जे शरीरात नवीन पेशी बनवण्यासाठी आणि जुन्या पेशी चांगल्या करण्यासाठी उपयोगी असते. पालक मधील विविध घटक शरीर निरोगी ठेवण्यास उपयोगी ठरते.
ब्रोकोलीपासून शरीराला जीवनसत्त्व ‘अ’ आणि ‘क’, प्रथिने आणि कॅल्शिअम मुबलक प्रमाणात मिळते.

सध्या संसर्गजन्य रोगांचे प्रमाण आपल्याला वाढलेले दिसत आहे. त्यासाठी मानवी शरीराला नैसर्गिक रित्या रोगप्रतिकार शक्ती निर्माण करणं गरजेचं झालं आहे. आपली स्वतःची काळजी घेऊन आपल्या फॅमिली डॉक्टरच्या सल्ल्यानुसार पौषटीक आहार प्लॅन करायला हवा…

You May Also Like

error: Content is protected !!