एसटी संपाबाबत विधान भवनात बैठक सुरू

मुंबई । महाराष्ट्रातील आताची सर्वात मोठी बातमी एसटी संपकरी आणि कामगारांसाठी आहे. एसटी संपाबाबत विधान भवनात महत्त्वाची बैठक सुरू आहे. विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर यांच्या दालनात ही महत्त्वाची बैठक सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार परिवहनमंत्री अनिल परब, दरेकर बैठकीला उपस्थित आहेत. गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोतही बैठकीला उपस्थित असल्याची माहिती मिळाली आहे. एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक या बैठकीला उपस्थित आहेत.
एसटीचा संप मिळणार का? या संपावर तोडगा आजच्या बैठकीत तरी निघणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. आजच्या बैठकीत काय चर्चा होणार याकडे एसटी कामगारांचं लक्ष असणार आहे.

You May Also Like