भाजपच्या राष्ट्रीय सचिवांची बैठक

पंकजा मुंडे, विनोद तावडेंसह मोठे नेते उपस्थित
नवी दिल्ली । उत्तर प्रदेश आणि इतर निवडणुकांसाठी भाजपने मोर्चेबांधणीला सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपकडून दिल्ली दरबारी बैठकांवर बैठका घेतल्या जात आहे. याचाच भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी भाजपच्या राष्ट्रीय सचिवांची बैठक पार पडत आहे. या बैठकीला महाराष्ट्रातून भाजपचे राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, विनोद तावडे यांच्यासह मोठे नेते मोदींच्या निवासस्थानी पोहचले आहेत.

 

आगामी उत्तर प्रदेश आणि इतर राज्यातील निवडणुकांसाठी भाजपकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा दिल्लीत वारंवार बैठका घेत आहेत. अगोदर त्यांनी महासचिवासोंबत बैठकी घेतली. नंतर वेगवेगळ्या आघाडीच्या नेत्यांसोबत बैठक झाली. त्यानंतर रविवारी भाजप नेते बीएल संतोष आणि जेपी नड्डा यांनी दिल्लीतील भाजप कार्यालयात सर्व तेरा राष्ट्रीय सचिवांसोबत बैठक घेतली आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी भाजपच्या राष्ट्रीय सचिवांची बैठक सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट आता सचिवांसोबत चर्चा करणार आहेत.

You May Also Like