देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलारांची अमित शाहांसोबत बैठक

नवी दिल्ली । केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत गुप्त भेट झाल्याची माहिती आहे. त्याआधी आशिष शेलार आणि अमित शाहांसोबत स्वतंत्र बैठक झाली आहे. आधी देवेंद्र फडणवीस त्यानंतर आशिष शेलार अमित शाह यांना भेटले. यानंतर आता उद्यापासून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील चार दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. भाजप नेत्यांच्या या बैठकांमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरु झाल्या आहेत. भाजप नेत्यांच्या अमित शाह यांच्या सोबतच्या स्वतंत्र बैठकांचा नेमका अर्थ काय? असा सवालही उपस्थित होत आहे.

 

 राज्याच्या राजकारणाबाबतही भाजपकडून अनेक चाचपण्या सुरु आहेत. मात्र जेव्हा जेव्हा गुप्त बैठका होतात तेव्हा मोठा विषय चर्चेत असतो हे आजवर दिसून आलं आहे, असं रवीकिरण देशमुख यांनी म्हटलं.  भाजप नेत्यांच्या भेटी मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिका निवडणुकीची रणनिती आखण्यासाठी ही भेट असावी. मुंबई महापालिकेवर सत्ता काबिज केली तर शिवसेनेला मोठा धक्का असेल. भाजपच्या संघटनात्मक बदलाविषयी बोलायचं तर देवेंद्र फडणवीस यांचं एवढं मोठ स्थान नाही की त्यांना तिथे चर्चेसाठी बोलवलं जाईल, असं राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे यांनी म्हटलं.

You May Also Like