पीएनबी घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सी अँटिग्वामधूनही गायब

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणातील आरोपी मेहुल चोक्सी मागील तीन दिवसांपासुन गायब झाला आहे. त्याचे वकील विजय अग्रवाल यांनी असा दावा केला आहे की आरोपी कुठेतरी गायब झाला आहे. यानंतर अँटिग्वा पोलिसांनी त्याचा तपास सुरू केला आहे. मंगळवारी अँटिग्वाच्या स्थानिक रिपोर्टमध्येही चोक्सी बेपत्ता झाल्याचं सांगितल गेलं आहे.

दरम्याण, हिरा व्यापार्‍याची गाडी संध्याकाळी जॉली हार्बर येथे आढळली. चोक्सीचे वकील अग्रवाल म्हणाले, मेहुल चोक्सी गायब आहे. त्यांच्या कुटुंबातील सदस्य चिंतेत आहेत आणि त्यांनी मला बातचीत करण्यासाठी बोलावलं होतं. पोलीस सध्या याप्रकरणाचा तपास करत आहेतं.
तर चोक्सीवर 4 जानेवारी 2018 ला अँटिग्वाला फरार होण्याआधी पंजाब नॅशनल बँकेसोबत 13,578 कोटीचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. या घोटाळा प्रकरणी चोक्सीविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. तो 2013 मध्ये कथितपणे शेअर बाजाराच्या घोटाळ्यातही सामील होता.

You May Also Like

error: Content is protected !!